Sun. Apr 5th, 2020

काव्यपुष्पाची उधळण करत सरली ‘एक माध्यान्ह प्रेमाची’

९ कवितासंग्रह प्रकाशनाच्या दिमाखदार सोहळ्यात १२० कवी काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित तर १० साहित्यिक साहित्य सेवारत्न पुरस्काराचे मानकरी.
नागपूर: डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ऊरवेला कॉलनी, नागपूर येथे दि. २६/१२/२०१९ रोजी ‘एक माध्यान्ह प्रेमाची’ राज्यस्तरीय कवी संमेलन, ९ कविता संग्रहाचे प्रकाशन, १० साहित्य सेवारत्न पुरस्कार व निमंत्रित १२० कवींना काव्यरत्न पुरस्काराने संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील व सचिव पल्लवी पाटील यांनी सन्मानित केले. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर तर्फे हे राज्यस्तरीय कवी संमेलन थाटात संपन्न झाले.

राज्यातील विविध ठिकाणी आपल्या लेखणीद्वारे मराठी भाषेसाठी कार्य करणा-या खालील ज्येष्ठ साहित्यिकांना संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील व सचिव पल्लवी पाटील यांच्या हस्ते शाल, मानपत्र, मेडल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असलेला ‘साहित्य सेवारत्न पुरस्कार’ २०१९ देऊन सन्मानित करण्यात आले. मा.सौ.पदमा जाधव,औरंगाबाद ( लेखन समीक्षा विभाग), मा. डॉ अनिल पावशेकर, नागपूर (स्तंभलेखन विभाग), मा.सौ. वैशाली अंड्रसकर, चंद्रपूर (काव्य परीक्षण विभाग)’मा. श्री. विरेंद्र गणवीर, नागपूर (नाट्यलेखन विभाग)’ मा. सौ सविता पाटील ठाकरे, सिल्वासा (काव्य समीक्षण विभाग), मा. सौ. कल्पना शाह, ठाणे (चारोळी लेखन विभाग), मा. श्री. संग्राम कुमठेकर, लातूर (काव्यलेखन विभाग), मा. सौ. प्रतिमा नंदेश्वर, मूल (काव्यलेखन विभाग), मा.श्री. नागोराव कोम्पलवार, यवतमाळ (काव्यलेखन विभाग). तसेच ययसंस्थेचे विश्वस्त अरविंद उरकुडे, गडचिरोली यांना प्रा ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवाण्यात आले. नांदेड येथील कवयित्री प्रमिला सेनकुडे यांनी संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील यांचा साडी चोळी व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार केला.
मराठीचे शिलेदार प्रकाशनाने काढलेल्या राज्यातील ९ कवी कवयित्रींच्या कवितिसंग्रहाचे प्रकाशन व ‘आम्ही काव्यरत्न’ या प्रातिनिधिक चारोळी संग्रहाचे प्रकाशन अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री पद्मा जाधव, औरंगाबाद, प्रसिद्ध स्तंभलेखक उद्घाटक डॉ अनिल पावशेकर, नागपूर, प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी सखे साजणीकार प्रा. ज्ञानेश वाकुडकर, नागपूर, डॉ सोहन चवरे, प्रमुख अतिथी, अध्यक्ष कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटना, नागपूर, संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, सचिव पल्लवी पाटील, कवी संमेलनाध्यक्ष संग्राम कुमठेकर, लातूर, ज्येष्ठ कवी नागोराव कोम्पलवार, यवतमाळ व ज्येष्ठ कवी श्रीराम केदार, नागपूर यांच्या हस्ते पार पडले.
‘एक माध्यान्ह प्रेमाची’ राज्यस्तरीय कवी संमेलनात मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे प्रकाशन झालेल्या भरारी – सौ प्रतिमा नंदेश्वर, मूल, गुंजन मनीचे – सौ वसुधा नाईक, पुणे, स्पर्शगंध – सौ वृंदा करमरकर, सांगली, भावस्पर्श – सौ सौनाली सहारे, ब्रह्मपुरी, काव्यदीप – सौ अंजु येवले, उमरेड, प्रभात – सौ सविता झाडे पिसे, चिमूर, हर्ष – श्री सुभाष डोंगरे, पांढरकवडा, शब्द ओंजळ – श्री विलास सूर्यवंशी, मुंबई या सर्व कवितासंग्रहाचा समावेश होता.
दुपार सत्रात बहुजन रंगभूमी प्रस्तुत नाट्यलेखक विरेंद्र गणवीर लिखित व श्रेयस अतकर दिग्दर्शित ‘तमासगीर’ या एकांकिकेचा प्रयोगही टेरीस थिएटर येथे सादर करण्यात आला. या बहारदार कवी संमेलनात १२० निमंत्रित कवींनी हजेरी लावली होती. ‘आम्ही काव्यरत्न’ संपादक मंडळातील राहुल पाटील, पल्लवी पाटील, वैशाली अंड्रस्कर, सविता पाटील ठाकरे, अशोक लांडगे व अरविंद उरकुडे यांच्या हस्ते सर्व कवी कवयित्रिंना ‘काव्यरत्न पुरस्कार २०१९’ ने सन्मानित करण्यात आले. काव्य सादरीकरणात प्रेमाची शीतलहर आलेल्या अशा विविध सरस रचना कवी कवयित्रींनी सादर केल्यात अशाप्रकारे काव्यपुष्पाची उधळण करत एक माध्यान्ह प्रेमाची राज्यस्तरीय कवी संमेलनाचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
या संमेलनाचे सूत्र संचालन सहसंपादक सौ वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर आणि सौ सविता पाटील ठाकरे, सिल्वासा, दादरा नगर हवेली यांनी केले तर आभार सहप्रशासक हंसराज खोब्रागडे, गोंदिया यांनी मानले. या संमेलनास नागपूर साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्तिथी दर्शवत गुलाबी थंडीतील कवी संमेलन अनुभवले.
Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
× How can I help you?