Sun. Mar 29th, 2020

निफाड- नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव (निफाड) महिला बाल विकास प्रकल्पातील, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. मोहनजी वाळकेश्वर तुपे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा आज 31 डिसेंबर 2019 रोजी चांदोरी येथील मीरा लौन्स येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

कार्यक्रमाची मा. श्री. दीपक चाटे सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना मा. श्री गर्जे सर यांनी केली. आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान मा. श्री. अभिमान माने सर यांनी केला.

सोहळ्याचे आकर्षण मा. श्री. मोहनजी तुपे सर यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. दीपक चाटे यांनी केला.

उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील विविध बाल विकास अधिकारी मा. श्री. माने सर, मा. श्री. गर्जे सर, मा. श्री. फडोळ सर, मा. श्री. दिघोळे सर, मा. श्री. वाघ सर, मा. श्री. पगारे सर, मा. श्री. शेवाळे सर इत्यादी उपस्थित होती. तसेच निफाड 1, 2, 3 प्रकल्पाच्या सर्व पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस व इतर कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष मा. श्री. चाटे सर यांनी मनोगत व्यक्त केले. खांदवे मॅडम यांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
× How can I help you?