Sat. Apr 4th, 2020

ठाकरे दांपत्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जागतिक मराठी भाषा गौरव दिनी पुरस्काररूपी अनोखी भेट

नाशिक: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल, नेवासा जि.अहमदनगर येथे २७/०२/२०२० रोजी संपन्न झालेल्या ‘बहर मराठी प्रतिभेचा’ या जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात खाकुर्डी ता.मालेगाव जि.नाशिक येथील मूळ निवासी व सध्या दादरा नगर हवेली येथे कार्यरत असलेल्या ठाकरे दांपत्यास राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री प्रशांत दत्तात्रय ठाकरे हे संत झेवियर हायस्कूल, दुधनी तर सौ सविता प्रशांत ठाकरे या फातिमामाता हायस्कूल, वेळेगाव दादरा नगर हवेली येथे कार्यरत आहेत.

मराठीचे शिलेदार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल पाटील, विश्वस्त अशोक लांडगे, त्रिमूर्तीचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील, अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील, सभापती रावसाहेब कांगुणे, कवी संमेलनाध्यक्षा वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर, ज्येष्ठ साहित्यिक बळवंत भोयर, विशाखा कांबळे, प्रा. अशोक शिंदे या मान्यवरांच्या हस्ते ठाकरे दांपत्यास शाल, मानपत्र सन्मानचिन्ह व विशेषांक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राज्यातील एकूण २६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमात मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे प्रकाशित मराठी भाषा गौरव दिन विशेषांक २०२० सहित ७ कविता संग्रहाचे प्रकाशन संपादक राहुल पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ८५ पत्रकारांना व ६५ कवींना कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुस्तकावर बोलू काही या काव्यसंवादात्मक समीक्षण सदरात सविता पाटील ठाकरे, वसुधा नाईक, नागोराव कोम्पलवार, विष्णू संकपाळ, संग्राम कुमठेकर, रजनी पोयाम, कमलेश सोनकुसळे, पवन किन्हेकर व सुधाकर भुरके यांनी सहभाग नोंदविला. कवीसंमेलनाध्यक्षा वैशाली अंड्रस्कर यांच्या उपस्थितीत ६५ कवींनी आपल्या काव्यसादरीकरणांने उपस्थितांची मने जिंकली.
या बहारदार कार्यक्रमाचे सूत्र संचालन सविता पाटील ठाकरे, राहुल पाटील यांनी केले तर आभार हंसराज खोब्रागडे व विकास वरकड यांनी मानले.

Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
× How can I help you?